पान:अकबर काव्य.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- (८५) ज्याचे चित्त निरंतर प्रभु पदीं संलग्न पद्मी अंली । प्रेमानेंच निजाश्रितों उमगतां मोडी प्रबोधें कलि ॥ दीनांचा कनवाळु गर्व न मनीं जो वैभवाचा धरी । पोशिंदा वर-वर्णनीय गणिला जो सद्गुणांचा वरी ॥ वैरी आळस बुद्धिही न विजयी शत्रूस दासत्व दे । विश्वासें सुजना सर्वे रसवती सानंद वाणी वदे ॥ होता आकबर भूप-वर्य तनयां मायाळुसा बापतो । कांत प्रियकांत आठ सकळां स्नेहार्द्रही वाटतो ॥ जो शूरांस निजग्रणीच गमला युद्धांत मान - प्रद् । गुंडा सर्व रसां* तो विलसतो पृथ्वीस भूषास्पद ॥ जे होती मृत युद्धिं सैनिक-गणी मोठ्या मर्ने आश्रय । त्यांच्या सत्वर वारसास वितरी भीतां करी निर्भय ॥ अंतीं तो नृप सार्वभौम चटका लावून गेला जना । कीर्तीचा स्थिर देह ठेवुनि इथे त्याची सरे वर्णना ॥ समाप्त- ९४ ९५ ९६ ४००

१ परमेश्वराच्या चरणी. २ भ्रमर, भुंगा. भांडण. ४ याचा संबंध 'सद्गुणाचा' या शब्दाकडे. ५ आपल्या बायकांस. ६ नवरा. श्रृंगार वीर इ० रसांत ७ ( भूषा + आस्पद) भूषणभूत असा. ८ वर्णन.