पान:अकबर काव्य.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८१ ) सोन्याचे बादशहा तेवि रुप्याचे बदाम दुसरींही । उडवी फळें फलद त्या वेची जन हृष्ट त्या समुत्साहीं ॥ वैसे नृप सिंहासन जाई जवळून गज- घंटा मोठी | सालंकार सुवस्त्री मंडित वैभव अ-वर्ण्य ते ओठीं ॥ शक्तीनें राक्षस हे आकारें गमति पर्वतप्राय । वर्णानें सजल जलद कर्णी जणु वारितात निर्ज काय ॥ ते लांगूले हलवुनि शुंडादंडा उभारितां गमले । निजपोषर्णे कृतश प्रभुमूर्तिस पाहतां जणो रमले || भूपाची त्यांच्यावर त्यांची भूपावरी जडेभक्ति ॥ युद्धांत ते जयप्रद पाहे लोभवि गुणज्ञ मंति- शक्ति ॥ नीट शिके कसरत करि बत्ती तोफेस दे पतित वस्त ॥ हस्तिपकाच्या हस्तीं ठेवी निर्भय रणीं लढे मस्त ॥ वैराचे निर्यातन करणें सावधपणेंचि यच्छील । आज्ञाधारक अद्भुत जीव ह्मणे भूप सुखवि हा दीलं ॥ हत्ती रेनें होती बादशाहाचच एकशे एक । यती ठेवुनि पद त्यांवरि बैसे पळांत निःशंक ॥ कुंजरे पंच सहस्रावधि होते राज संग्रहीं अन्य । याचें नांव ह्मणावें गजांत लक्ष्मी- पति प्रभू धन्य ॥ - ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ GT ७४ ७५ १ हत्तींचा समुदाय. २ ओठांनीं. ३ हत्ती. ४ पाण्यासहवर्तमान मेघ. (काळे) ५ आपलें शरीर. ६ बुद्धीचें सामर्थ्य. ७ जिन्नस ८ महाताच्या ९ ज्याचा स्वभाव. १० अंतःकरण. ११ जें स्वजातींत श्रेष्ट त्यास रत्न असें ह्मणतात. १२ हत्ती. १३ ( गज + अंत + लक्ष्मी ) ज्याच्या संग्रहीं हत्ती असतात त्याजवळ गजांत लक्ष्मी आहे असें ह्मणतात. ६