पान:अकबर काव्य.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८० ) दूरुनि परबल - हननक्षम घेउनि बंदुका कमानाही । चालति वेगें योद्धे भेदन- पटुताचि यत्समा नाहीं गजमुक्त - पृष्ठि शोभे सोन्याची भव्य दिव्य अंबारी । . ऐरावत- स्थित गमे नृपतींत स-मोद जेवि जंभारी सरदार यवन होती मानकरिहि करि - विरूढ रजपूत । तत्तत्प्रांतापासुनि अधिकारी नृपतिर्ने समाहूत - . आक्बर बावर कुल - नृप - भास्कर स विशेष दृष्टिला ओढी लोका चंद्र - विलोकन नतशी नक्षत्र - दर्शनीं प्रौढी ऐशा रीती मिरवे स्वजनान्वित मंडपीं प्रवेश करी । मुख्यासनीं विराजे नृप अंबरिं रवि जसा सहस्र करीं समयोचित भाषण ते सरदार करून राय गौरविती । मधुरोत्तरांत वितरी जें सुख तो त्यांस त्या नसेच मिती ॥ भूषा- वसनें अर्पिति मानकरी थोर सार्वभौमातें । मोहक गायन चाले सुख दाटे अंतरी समाजातें ॥ नर- पुंगव ह्या समयीं सरदारांतें उदार - धी वितरी । रत्न मौक्तिकमाला गुणवंतां सगुण अश्व - गणहि करी ॥ सोनें रूपें सुगंधि द्रव्य तशा वस्तु आणखी रुचिर । तोलुनि तुलते भूप-श्रेष्ठासह वांटिती तदा सुचिरं ॥ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ १ ' गजमुक्क' नांवाच्या हत्तीवर. हैं अकचराच्या हत्तीचें नांव होतें. २ ऐरावतावर बसलेला. ३ ( जंभ + अरि) जंभ नांवाच्या दैत्याचा शत्रु-इंद्र. ४ हजार किरणांनीं. ५ परिमाण. ६ उदार बुद्धीचा. ७ मोत्यांच्या कंठ्या. ८ तागडींत. ९ बराच वेळपर्यंत.