पान:अकबर काव्य.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७९) जिकडे तिकडे वाजति मंगल वाद्ये पुरांत जन अंगा । प्रेमें अंगोद्वैर्तन लाविति आधीं करूनि अभ्यंगा ॥ उष्ण-जल - स्नात पुढे उत्तम पोषाख लेउनी अंगें । सालंकार निघाया तयार होती पुढे नृपति संगें ॥ स्वारीच्या पुढति तदा मंद्र- ध्वनि थोर चवघडा वाजे । . - घन गर्जनाच होते अ-संमयि भासे जना असा गाजे ॥ वाजति शिंगे करणे लांब तुताऱ्या मनोज्ञ सनायाही । डंके नौबति ताशे होती जन हृष्ट अंतरीं यांहीं ॥ अरि-धूमकेतु तोफा करणान्या शत्रुचे रणीं तुकडे । चालति गोलंदाजा - सह यन्मति पूर्ण कीर्ति हेतुकडे ॥ पुष्ट अशा मल्लांच्या चालति रांगा पुढे करुनि छाती । जाणों देहें स्वबळें उत्साह भीमसेनसे जाती ॥ चपले पार तेजस्वी चमकत हस्तांत तीव्र तरवारी । संघ शिपायांचा जो चाले व्यसनास शीघ्रतैर वीरी ॥ फडके ध्वज दिल्लीच्या नाथाचा भव्य कांचना पारस । झळके प्रताप संभव ते जे देणार ताप जो अरिस ॥ सादी सैंधव - पृष्ठ जाती आरूढ नीट ओळीनें । पाठीस ढाल बांधुनि कटिला तलवार खंचित खलीनें ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ १ उटी. २ गंभीर आहे ध्वनि ज्याचा असा. ३ अवेळीं - त्याची योग्य वेळ नसतां, भलत्याच वेळीं. ४ शत्रूंना अरिष्ट सूचक अशी शेंडेनक्षत्रेंच. ५ फार लवकर. ६ नाहींसें करितो. ७ पराक्रमापासून आहे उत्पत्ति ज्याची अशा. • घोड्याच्या पाठीवर. ९ लगाम.