पान:अकबर काव्य.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७८) विसरू कसे लिहाया बेंटिकाचे कृतज्ञ मी नांव । आंग्लवराचे यत्कृति अबलांते जाहली अशी नावै ॥ समारंभाची स्वारी. - गीति. - ४२ ४३ ४४ भूपाच्या जन्म-दिनी विषुव दिनींही महोत्सवा करिती ॥ जन- मोदे - सिंधुला ये नृप - मैह - चंद्रोदये महा भरती ॥ मंडप किनखाबी बहु उन्नत विस्तृत उभारिती त्यांत ॥ उंच मधोमध मांडिति सिंहासन मणि- सुवर्णमय कांतें ॥ रांगांनी दों बाजुस ठेविति विस्तीर्ण शैकडों मंच ॥ मखमालीने आवृत बहु मृदु बसण्यास आसने उंच ॥ जागोजाग तदा ध्वज उच्छ्रितं उभावेति यदीय जरिपटके ॥ रवि - कांतीने झळकति दिपविति नेत्रांस खेद मनिं न टिके ॥ ४६ अहमहमिका धरुनि ते जाति गमे अंबरासि गांठाया ॥ पवन चले-पट शिरे जणु डोलविती उंच जाउनी ठाया ॥ नगरीं प्रातःकाल उठोनि आबाल वृद्ध सानंद ॥ या दिनिं राहति जन्मे कीं गुणवान् भूप लोक - सुख - कंद ॥ ४५ ४७ ४८ १ हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल. इ. स. ( १८२८-१८३५) लॉर्ड बेंटिंक ह्याचें. २ ज्याची वरील कायदा हीच कृति 3 संकट तरण्याचे साधन - नौका. ४ रात्र आणि दिवस ह्यांचें मान सारखं असर्णे ह्यास विषुव असें म्हणतात. हैं मान वर्षातून मेषसंक्रांत आणि तुला संक्रांत ह्या दोन दिवशीं असतें, त्या दिवशीं. ५ लोकांचा आनंद हाच समुद्र त्यास. ६ राजाचा महोत्सव हाच चंद्रोदय त्यानें. ७ सुंदर. सुंदर. ८ उंच ९ वान्यानें हलणारी वस्त्रें हींच डोकीं.