पान:अकबर काव्य.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) शार्दूलविक्रीडित. आकाशांतुनि आमिषास बघतां रॉखून येतो जसा । आशेनें झड घालण्या तदुपरी वेगे ससाणा तसा ॥ आला बाबर लालसा धरुनि तो पोटामधें शंभर । दिल्ली-वल्लभ व्हावयास पुरवी त्या सर्व विश्वंभर ॥ दिंडी. भाग्यशाली सत्यैक-निष्ट शूर | मनें प्रेमळ, संशया वसे दूर ॥ स-दय पोटीं तैसाचि हर्ष-सिंधु। महात्म्यांना तो गमे आत्म-बंधु १५ स्थापि राज्याला एथ मोगलांचे । कीर्ति ज्याची वर्णितां नये वाचे ॥ धन्य ह्मणती लोकांत असे राजे । सद्गुणांची यन्मती खाण साजे १६ पुत्र त्याचा प्रख्यात हुमायून । पित्याहुनि जो भासला किंचिदून ॥ जीवमात्रां गुणभाग ईश देतो । विषम वुद्धीतें परी वागवीतो १७ अकबराचें जन्म. गीति. तो राज्य करित असतां केले त्या शत्रुनें पराभूत मग पारसीक-देशाधिपतिकडे जाय तो अनाहूत ॥ मार्गी जातां त्याची प्रिया हमीदा सती उमरकोटीं । प्रसवे एक सुतातैं लाजवितो जो गुणीं अमरैकोटी ॥ ४ मांसास २ इच्छा. ३ ( किंचित् + ऊन ) थोडा कमी. ४ गुणांचा वाटा. ५ दवे जातीस.