पान:अकबर काव्य.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- (७६) माझ्या दुष्कृति ज्या कधीं विधिवशे हस्तांतुनी जाहल्या । वाणीनें ममताळु बोध करुनी त्या पाहिजे वर्जिल्या ॥ सांग काय ह्मणे मदीय गुण जे अत्यल्पही शैलसे । मोठे वाटति ज्यास जीव मति ही मी अंतरंगी वसे ॥ माझ्या वांचुनि चैन तूज न पडे गेलासि तूं एकटा । कैसा स्वर्ग सुखोपभोग करण्या कैसा तरूं संकटा ॥ एकाकी * वद राजनीति - कुशला नौका+ गमावून मी । होतों पूर्ण सुखांत पूर्ण विधुसा झालों नशीबें कमी ॥ विद्वत्व रसज्ञताहि पटुता वाक्यांत तर्कान्वित । तैशी सांग नरोत्तमा सुजनता मानार्हता संस्तुत । खाशी निःस्पृहता दया- घनं पदीं निःसीम ती लीनता । चित्तौदार्य कुठे समस्त गुण हे एकत्र पाहूं अतां ॥ ग्रासी मोह पुनःपुन्हा स्व -मतिला सर्वस्व गेलें गमे । जीवावांचुनि देह तेवि न रुचे मित्रा तुझ्या संगमे ॥ हें सारे मम राष्ट्र हीन चतुरा चंद्राविणे *शर्वरी, किंवा भव्य तलाव जो परि जलाभावास तापें वरी बापा चालति पाय हात करिती नेमें स्व- कर्मै बरी । शब्दांचा गण ये मुखांतुनि दृढाभ्यासें जरी लौकरी ॥ - ३० ३१ ३२ ३३ १ वाईट कर्मे. २ अकबर त्याचा केवळ जीव. * एकटा. † नांव. + ३ वाखाणलेली. ४ दयेचा केवळ मेघच जो ईश्वर त्याच्या चरणीं. ५ तत्परता. ६ (चित्त+औदार्य ) मनाचा मोठेपणा. ७ ह्याचा अन्वय 'हीन' या शब्दा- कडे. * रात्र. ८ ( जल + अभाव) जलाचें नाशास. ६ उष्णतेच्या तापानें: