पान:अकबर काव्य.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७५) स्रग्धरा. मांगाची जीवघाती कृति कैरि कपटी जन्मुनी सत्कुलांत । जातीचा थोर लोभी विसरुनि सगळे वृत्त एका पळांत ॥ स्वोत्कर्षासाठिं भारी अधमपण धरी है सले शल्य पोटीं । रत्नांच्या खाणिमाजी विमल निपजली सत्य ही गारगोटी ॥ २६ शिखरिणी. अभावे दुष्टांच्या विष - विषम पृथ्वी तल वर । सदिच्छावंतांतें अमृत गंमतें बोलति नर ॥ जरी देव सर्पाविण विरचिली सृष्टि असती । तरी होता लोकां सुखद विपी चंदन किती ॥ शार्दूलविक्रीडित २७ २८ वार्तेने खवळे नृपाळ त्हृदयीं जो कोंवळा विव्हळ । दातांनी अधरोष्ठ - भाग रगडी संक्षुब्ध दावानळ ॥ जाळी वैरि - तृणास तुच्छ सहसा तो सत्य ओर्छापति । प्रेषी सैन्य वधावया परि छपे तो सर्वदा पर्वतीं ॥ कांहीं काळ नृपाळ शोक- जलधी मध्ये बुडे मीनसा । भासे सर्व सुर्णे तया जग ह्मणे निःसार झाली रसा ॥ गेला दीप मनो-गृहीं अ-सुख हा अंधार माजे भला । माझा मित्र अमोल रत्न वधिला कां लाभ वाटे खला ॥ २९ • ह्याचा कर्ता ओर्छाचा पति, अध्याहृत. २ वाटलें असतें. ३ वृक्ष. ४ पृथ्वी..