पान:अकबर काव्य.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६९ ) आकर्षी फिरवी ग्रहांस उजळी तेणें 'ग्रहांचा पती ' । तेजस्वी अधिकार चालवि जगीं मानी मदीया मती ॥ मंदाक्रांता. नाहीं कांहीं स्थिर जार्ग असे सर्वही दो दिसांचे । माया - मोहे मनिं न उमजे मानवां लागि साचें ॥ स्वप्नींचा तो सकल असतो जेवि खोटा पसारा । देई मोठा कितिक म्हणती संसृती ताप सारा ॥ द्रव्ये मद्ये अधिकृतिवशे मत्त झाल्या नृपाते । प्रार्थायाला क्षणिक सुख तें घ्यावया कोण जातें ॥ त्याते जातो शरण म्हणती रक्षिण्या भक्त जागा । देवाजी जो मुख पसरण्या तोच कीं युक्त जागा ॥ ज्याच्या पाशीं कधिं न मिळतो चाढ लोकांस थारा । ज्या पासूनी सतत असतो दूर अन्याय सारा ॥ यत्प्रीतीला सुखद बरव्या स्वप्निंही खंड नाहीं । त्या विश्वाच्या शरण रिघतों राजयाते सदाही ॥ ज्याच्या पाशीं कधिं नच असे जाणिवेलागि तोटा । : : लोकां पीडा विण दिधलिया कोश ज्याचाहि मोठा ॥ ज्या रामा करूं न शकती क्षुद्र कामांध मंद । त्या राजेंद्रा अह्नि ह्मणतसौ मानसा शीघ्र धुंड । ९० ९१ ९२ ९३ ९४ १ बुध, शुक्र, गुरु इत्यादिकांस २ एथून पुढें नव्वद श्लोकापर्यंत भगव- द्रक्ताचें स्वमत- प्रदर्शन आहे. ३ ज्ञानाला.