पान:अकबर काव्य.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६८) ८५ ८६ ८७ अल्ला ह्यास्तव थोर अर्थ पहिला आहे गमे त्यां असें । आहे आक्बर भूप ईश्वर असा अन्यार्थ सांगे रखें ॥ सूर्या भूप जगांत दृश्य विभुची मान्या विभूती ह्मणे । झाली सृष्ट तदीय मूर्त करुणा त्याच्या सुखा कारणें ॥ पाणी शोषुनि हा पवित्र किरणीं पर्जन्य पाडी पुढे । ह्याचा स्तुत्य सुधी अवर्ण्य महिमा वर्णावया बापुडे ॥ तेजस्वी राव हा निजोष्ण - किरणी चैतन्य देई जनां । आणी दृष्टिपथांत वस्तु सगळ्या संतोष ओपी मना ॥ सारेही नर सानथोर करि हा आसक्त कर्मी निज । येऊनी उदया प्रफुल्ल करि ही पृथ्वी जणों वारिज ॥ ह्याच्या पंडितमंडळी गुण-गणीं संतुष्ट हो अंतरीं । टेवी अंबर - रत्न भास्कर अशीं अन्वर्थ नामें तरी ॥ देतो ताप तथापि मित्र ह्मणती आश्चर्य वाटे मना । लोक ह्या गुणसंधिं दोष दडतो हे ना असत्कल्पना ॥ आहे कारण पावसाशि रवि हा वायु प्रवाहासही । कांतीचा झर तीस नित्य पसरी जाणे समस्ता मही ॥ नाहीं काय यथार्थ नांव असल्याला लोक - बंधू असे । सांगा स्पष्ट तया सहस्र-कर की संज्ञा अयोग्या असे ॥ ८९ कैसा पेटत राहि अंबरिं सदा वाटे अतर्क्याग्नि हा । शास्त्रज्ञांसहि पोर्टि जागृत असे हें जाणण्याची स्पृहा ॥ ८८ १ तेजस्वी मूर्ति. २ जगाच्या. 3 चेतना जीवकला. ४ लोकांचा मित्र. ५ नांव. ६ इच्छा.