पान:अकबर काव्य.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६७) आह्मी ज्यास ह्मणों सदैव वदनों बोले अबुल्फाजल । अल्ला ख्रिस्त - पथानुयायि जगताचा ह्या प्रभू प्रांजल ॥ विष्णू वैष्णव शंभु शैव ह्मणती शंक्ती स्वहृत्संमता । विद्वान्बोलति शाक्त ह्या जगिं समस्तांचाहि तो रक्षिता॥८२ त्याचा आकबर हा असे प्रतिनिधी एथे प्रजापालक । लोकांते निरखी समान हृदयीं सर्वाहि तद्वालक ॥ देवें तो मज आधिपत्य दिधलें भोगार्थ ना आपल्या । तद्रक्षार्थ ह्मणे सदा स - करुणें सन्मार्ग - योगें भल्या ॥ ८३ अग्नी सूर्य जलादि वंद्य असती देवांश जन्मांतर । जीवा संभवत स्वकर्म-वशगां देह-क्षयानंतर ॥ नैकरस्त्री - पतिता नरांस विहिता सुंता प्रभूपासना । दीक्षा- दान न गाइलागिं वधणे 'दीने इलाही ' गणा ॥ ८४ 'अल्ला* आक्चर' हो!' असें वचन तो लोकां खुणेचें वदे । rasarin विबुनि वसे तें नेहमीं शर्म दे ॥ १ देवी. २ (तत् + रक्षा+अर्थ ) त्या बालकांच्या रक्षणाकरितां. 3 (जल+ आदि) पाणी गाय, वनस्पति वगैरे पदार्थ देवाचे अंश आहेत असा समज होता म्हणून ते वंद्य असें झटलें. ४ जीवास मरणानंतर त्याचें अन्य योनींत जन्मणें. ५ ( न + एकखी + पतिता ) अनेक बायकांचा पति (नवरा) असणें म्हणजे पुष्कळ बायका करण्याची मोकळीक असर्णे ६ हा एक मुस- लमानांतला धर्म संस्कार आहे. ७ धर्माची दीक्षा देणें. ८ है. आक्चरानें स्थापिलेल्या नवीन धर्माचें नांव. * 'अल्ला हो आक्चर' हैं वाक्य आक्चर आपल्या नवीन धर्माची दीक्षा लोकांस देण्याचे वेळीं त्यांस सांगे. + शब्दाचे अर्थ दोन आहेत:- एक, 'मोठा, ' व दुसरा अकबर बादशाह. + होय. $ दोन अर्थाचें बोधक.