पान:अकबर काव्य.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६६ ) ७८ नाहीं काय तुम्हांस वाटत बळें विश्वास शांतिप्रद । आहे धर्म-पथांत तत्व नुमजे सर्वां कसे शर्मद ॥ काजीसाब तुह्मी तिरस्कृति करां अन्यां ह्मणा काफरे । विश्वाच्या जनकास संतति दुजी नाहींच कां साक्षर ॥ सांगाहो नसतात मार्ग बरवे एका स्थळा शेंकडों । जाया काय ? अपार दोष मतिचा हा मोह - नारों झडो ॥७९ आहे काय बघा अहो सुनिशिया * -पंथांत मेळ भ्रमै । अन्योन्यांस पहातसा निशिदिनीं पाण्यांत की संभ्रमें ॥ बोला तो मग भिन्न-धर्म-पथि ये दृष्टी न कोणाकडे । याचा येइल दोष मानसिं धरा कां व्यर्थ हो वाकडे ॥ जो ज्याचा निजधर्म तोच वितरी त्यातें खरें सौख्य ही । श्रीकृष्णोक्ति पुरातनी बहुबरी वाटे मला प्रत्यहीं ॥ द्वेषातें न करा मनीं समपणा सोनें सुर्खे बाळगा । ८० कोणातें न छळा स्वकीय समजा सन्मार्ग दावा जगा ।। ८१

6 १ विधर्मी लोकांस मुसलमान लोक काफर असें ह्मणतात. ह्मणतात. काफर म्हणजे नीच, ठक, खऱ्या देवाला सोडून भलत्याची पूजा करणारे. २ ( स+अक्षर ) विद्वान्. ' सुनी' आणि 'शिया' हे दोन्ही मुसलमानी धर्मप होत. - ' सुनी' हे कुराण व पुढे निघालेले संप्रदाय या दोहोंस प्रमाण मानितात, व पैगंबरानंतर झालेले चार खलीफ यांना हे पूज्य मानितात. 'शिया' हे केवळ कुराणास प्रमाण मानितात, व पुढें जे संप्रादाय निघाले त्यांजवर यांची श्रद्धा नाहीं. पैगंबरानंतर जे तीन खलीफ झाले त्यांस हे पूज्य मानीत नाहींत. हे लोक बहुतकरून मक्केची यात्रा न करितां हुसेनाचे मृत्यु - स्थान जें 'करचाळा' तेथे जातात. हे मोहरमचा उत्साह करितात. हे ह्यांना पाखांडी म्हणतात. 3 मेळ. 'सुनी 1