पान:अकबर काव्य.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३ ) उत्साह संपन्न अदीर्घसूत्र । शेखोराचा सुत पुष्ट- गात्र ॥ अ- मित्र निर्दाळुनि राज्य पावे। तो आशिआ-मध्य-गत स्वभाव ९ शार्दूलविक्रीडित. ४ कंदाहार करून चितिति मुनी ज्यातें तयाच्या कृपे । कंदाहार पराक्रमें करूनि घे शत्रू तया भी लपे ॥ झाला तो नरवीर बाबर जय श्रीचा पती संगरीं । ती तेजस्वि जनाप्रती क्रम असी कीं आवडीने वरी ॥ द्रुतविलंबित. १० समरकंदै हि घे नृपसत्तम । अमर नायक तुल्य-पराक्रम ॥ पुढति पाणिपत करि संगर । यशवरी बरवें धृति - सागर ॥ ११ चतुर राज्य करी नरे- केसरी । जन यदीय करूं न शके सरी ॥ लवकरी तलवार - बहादर । परि मरे विधिने निज बाबर १२ शिखरिणी. धनाने धान्याने युत भरत भूमी मिरवते । जिच्या मोठे मोठे नंग विलसती उंच वरते ॥ तितें घेऊं येति बहुजन असे दूरदूरचे । महत्वाकांक्षीते स्थल कितिक होते सुमतिचें ॥ १३ ३ सहज. १ चेंगट नव्हे असा. २ ( शेख + उमर ) शेखउमर ह्याचा. (कंद + आहार ) कंदमुळे खाऊन. ५ या नांवाचें शहर. ६ भ्याला. ७ पराक्रमी पुरुष. ८ जय लक्ष्मीचा. ९ युद्धांत. १० क्रम असा ( आहे ) ह्याचा अध्याहार. ११ एका शहराचें नांव. १२ इंद्राशी सदृश आहे पराक्रम ज्याचा. १३ नरश्रेष्ट. १४ ज्याची. १५ हिंदुस्थान, १६ पर्वत, १७ सद्बुद्धीचें ठिकाण असे.