पान:अकबर काव्य.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६४ ) ६२ केले बोलति मान्य भूप रमला तद्बुद्धिच्या वैभवीं । विद्या निर्मळ हेच सार हृदयीं मानी खरें या *भवीं ॥ त्याचा बंधु गुणाद्भुत प्रभु - वरा निःसीम तो आवडे । दोन्ही हात समान आसति परी श्रेष्ठत्व दक्षाकंडे ॥ व्यासंगी गमला जना सकाळिका विद्यार्णवीं मीनसा । जो त्यावाचुन मानितो स्वहृदयीं निःसार सारी रेसा ॥ ६३ एक ग्रंथ रसाळ ज्यास विरची तो इस्फहानी कवी । ये हाती जळका निमेनिम उभा त्याच्या जयाच्या रवी ॥ ज्ञानाचा सततोदयें विलसला विस्तीर्ण चित्तांबरों । त्याची दुर्घट तो दुज्या परि तदा पूर्णा समस्या करी ॥ ६४ त्याची दैव जुनी गवसली त्यालागि एक प्रत । तीशीं ताडुन पाहतांचि जमली केली नवी सांप्रत ॥ सांगा अद्भुत काय त्यांत जडली विद्वद्वरीं भूप - धी । भृंगी पद्मि गुणज्ञ नोळखि गुणां हैं तो घडेना कधीं ॥ तत्कालीन पिई समुद्र कृति हा भासे अगस्त्यासम ॥ धर्म-ग्रंथ विलोकुनी विविध तत्प्रज्ञा ह्मणे तूं रम ॥ विद्वैवृंद नृपासि तो निजसुखा साठी जरी शोधितो । ह्या विद्वन्मणिच्या समागम - सुखा राजेंद्र हो शोधि तो ॥ ६६ ६५

  • संसारांत १ उजव्या हाताकडे २ पृथ्वी ३ एक, दोन किंवा तीन श्लोक - चरण दिले असतां त्यांतील अर्थास अनुसरून श्लोकाचा अवशिष्ट भाग खतां तयार करून तो सगळा बनविणें त्याचें नांव समस्या पूर्ण करणें ४ ग्रंथ. ५ (विद्वत् + वृंद) विद्वानांचा समुदाय.