पान:अकबर काव्य.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६३) प्रेम श्लाघ्यगुणांहि चुंबक- मणी वेगें अयोघांतुला । त्या सत्संगति लाभली जिस नसे द्यायास योग्या तुला ॥५७ विद्वच्छेख - मुबारकात्मज बरा फैजी हिरा शोभला । लेखा माणिक अद्वितीय दुसरा भाग्ये पित्या लाभला ॥ त्यांत धर्म महंमदी पढविला तत्वें तयाचीं तयां । होती ज्ञात सु-वाङमैयास तरले वादी वरीती जया ॥ ५८ फैजी त्यांत कवी रसाळ मतिचा साहित्य - शौत्रा शिके । मेधावी हकिमत होय वरवा धन्वंतरी कौतुके || भाग्ये आकबरा पुढे वर हिरा तो जाय एके दिनीं । जोहारी नृप ओळखी सहज तो कीं हा असे सन्मणि ॥ ५९ राखी त्या चतुराग्रणीस निज तो हर्षे सदा संग्रहीं । बोले शोभवितात पंडित अलंकार प्रभेनें मही ।। नेमी त्यास गुणज्ञ आत्मतनयांसाठीं तयीं शिक्षक । की व्हावे क्षितिचे मनोहर पुढे ते सगुणी रक्षक ॥ तर्के गर्क करी वदे अचुक तो वाणी जसा गीति । योजी यास्तव त्या वकील परराष्ट्रींही कधीं भूपति ॥ आहे दुर्गम काय त्यां महिवरी जे बुद्धिचे राक्षस । ६० सिद्धी त्यांस गृहीत - कर्मि बहुधा होते सदाही वश ॥ ६१ जोडी तो 'कविराज' ही सुपदवी श्लाघ्या नृपापासुनी एकाने अधिक प्रबुद्ध शत तो सग्रंथ विद्वज्जनीं ॥ १ लोहचुंबक . २ ( अयस् + धातु ) लोखंडास ३ चांगल्या विद्येला. ४ विजयाला. ५ अलंकार शास्त्रास. ६ बृहस्पति.