पान:अकबर काव्य.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६० ) श्रुती श्रोत्यांच्या अमृत गमला गायन- रव । तुझा हस्तीं वागतहि रव भारी अभिनव ॥ श्रोत्यांची सहज तनु- भाना विसरती । तदा संसारींच्या विविध सहसा आधि सरती नकालाची त्यांतें गति अचुक रंगांत समजे । पराकाष्ठा मोठी निरुपम सुखाची तयें सजे ॥ पहा की गानाला हरिण पशु अत्यंत भुलती । कथा ज्ञानांची सुचतुर नरांची तरि किती ॥ सभा-रंगी सर्वाकरिशि जणु चित्रे विलिखितें । स्मृती त्याची चित्ता बहु असुखते पात्र करिते ॥ तुझ्या मत्संबंध सुरस नव नानाविध कथा | जनीं आश्चर्याच्या प्रचलित खनी ज्या सुख - पथा ॥ तयां दावीती सहृदय - वरा वीर विनुता । क्ष त्वन्मृत्यू विष - विषम होतील कथितां ॥ असें ऐश्वर्याच्या नग - शिखरि या वर्तत कमी । नसे मातें कांहीं परि तुजविणें होने बहु मी ॥ खरा ह्या संसारी जिवलगाच चिंतामणि नरा । हरी औधी प्रेमें न वितरि असा तोष दुसरा ॥ हवे त्यांबा मी करिन ह्मणतां ब्राह्मण तुवां । कसा घासायाचा क्रम खर तदा एक बरवा ॥ ४३ ४४ ४५ ४६ ४७ १ खाणी. २ रसिक लोकांत श्रेष्ट अशा. 3 विषासारख्या दुःसह तीम. • वर्तत असें (मी), असा अन्वय ५ उणा, कमी, बापडा ६ काळजी.