पान:अकबर काव्य.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५९) स्वभावें आनंदी सु-रस- कविता - सृष्टि विधि तो । जनेंद्राच्या प्रेम सतत सहवासें विलसतो ॥ गुणी पावे लोकों पद नुतं जनांहीं नियम हा । धरा ध्यानी व्हाया गुण-युत करा यत्नहि महाँ ॥ सभेमध्ये योजी अ-चुक वदनें दिव्य वचनें । घरी स्वांती मोही सहज रसिकाच्या विरेंचणें ॥ अशा सत्काव्यात राणं परजणें ही असिलता । अशीं कामें ज्याची अधिक विलसे तद्सिकता ॥ समीकीं दुदैवै विषय अफगाणांभिध पडे । कुवार्ता ही कर्णी जिवलग सखा ऐकुनि रडे । दयाळांचा राणा अवनि - पति ढाळी ढळढळ । स्वयें अश्रु प्रेमें विकल विलपे तो बिरबल || - करी ब्रह्मानंदा विरस रसिकांच्या अधिपते । अशा आनंदाचा झर सतत वाहीच सुमते । सदा होउनी तूं प्रथम आज दुःखीं ढकलिलें । कसे पीयूषाचें प्रखर विष हैं होय नकळ ॥ कला रम्या होत्या अवगत जिवींच्या जिवलगा । न गंधर्वालाहि असतिल अशा त्या स्ववशगा । ३९ ४० ४१ ४२ १ कविता रूप सृष्टि करणारा ब्रह्मदेव २ लोकाधिपति म्हणजे राजा. त्याच्या ३ स्तुत. ४ सद्गुण-युक्त. ५ मोठा. ६ मनाला. ७ रचणें-जुळणें. ८ तरवार. ९ युद्धांत. १० (अफगाण + अभिधा ) अफगाण नांवाच्या. ११ हा 'पडे' याचा कर्ता.