पान:अकबर काव्य.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) उपोद्घात. शार्दूलविक्रीडित कोणी ह्या जगती-तलीं कार्धं कधीं सद्भक्तले जन्मती । कोणी लोक-विलक्षणत्व धरिती विद्यार्जनें सन्मती ॥ कोणी देव-कृपा- सारत्पतितुनो भूपाल चुँडा- मणी । होऊनी उपलब्ध पुण्य-कृतिनें लोकांस देती धँणी ॥ उपजाति. वाटे मना आकबर भूप गावा । यथार्थ त्याचा महिमा वदावा ॥ जडाँध मी पावुनि दिव्ययष्टि । पूर्वेतिहासंज्ञ कृती न कष्टी ५ पूर्वजांची हकीकत. पराक्रमी तैमुरलंग वीर । होता बळें वैरि-तृणा समीरं ॥ वाटे स्वभावे सकळां सदर्प । मनुष्य देहें, जणु काल सर्प ॥ ६ जंगीजखानालय तें अजोळ । ज्याचें असा तार्तर तो विशाळ ॥ जिंकूनि ये देश अनेक वेगें । दिल्लीवरी हैं इतिहास सांगे ॥ ७ त्याच्या कुळी बाबर - नामधारी । जन्मास साँवा नर ये उभारी ॥ कीर्ति-ध्वजा तोहि अ-सीमं शूर । अन्वर्थ-नामा नरें-सिंह धीर ८ १ भूमंडळावर. २ सामान्य लोकांहून सद्गुणांत अधिकपणा. 3 देवाच्या कृपारूप समुद्रापासून. ४ राज-रत्ने, श्रेष्ट राजे. ५ मिळालेले, प्राप्त. ६ तृप्ति. ७ जड (अज्ञान ), ह्मणूनच अंध. ८ पूर्वीच्या इतिहास जाणणारांचे ग्रंथ हीच उत्तम काठी. ९ वारा. १० सहावा. ११ कीर्तिरूप निशाणास १२ निःसीम. १३ बाबर ह्मणजे सिंव्ह ह्या शब्दाच्या अर्थास अनुलक्षून आहे कृति ज्याची असा. १४ नरश्रेष्ट.