पान:अकबर काव्य.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५६ ) तो हा जो कपटी कठोर हृदयीं बोकाच वाटे जना । बाळांची निज भूक सत्य हरण्या साठीं करी योजना ॥ २४ डोळे नीट मिटोनि दुग्ध पिइ जो मार्जार लोभ छडी । नाणी मानसिं कों बसे विधिवशे पाठीवरी ते बड़ी ।। तैसा आत्मसुखार्थ नष्ट नृपती लोभें बुचाडी प्रजा । तो घातें नुमजे स्व-शत्रु समयीं भावील मोटी मजा ॥ २५ लोभाविष्ट नृपाळ शोषि अनयें आत्म- प्रजेच्या धना । युक्तीचे नव योजुनी प्रभुपर्णे नानाविधा सांधनां ! रक्त-प्राशक तो जना शंठे गमे मोठा जलौकेहुनी । रक्ताच्या सुख दुष्ट देइ बहुधा स्वांतास जी प्राशनीं ॥ २६ होता आकवर भूप सिंह न तसा नेमस्त घेतो कर । · प्रेमें रंजवि राजरत्न सकलां होऊनि सौख्याकर । मानी लोक सुखांत हर्ष - भर तो लोभा विषातें त्यजी । राजी त्यास निज-प्रजा बिलगली स्वांतांत तन्निष्ठु जी ॥ २७ राजा तोडरमल कल्पक रची धी - वारिधी कायदे । शांतांतःकरणे अपाप मतिचा लोकां नृपा फायदे | होती पासुनि ज्यांचिया उभयतांतें ही तरी आवडे । काळीचे परमेश भक्त सुकृतीं प्रेमा जयाचा जडे ॥ राजा गुर्जर - देश घे जमिनिच्या तेथे व्यवस्था करी । राजा तोडरमल्ल निस्तुल जमाबंदी रणीं केसरी । १ उपायांस. _ २ वंचक. 3 जळवेहून. हैं नामाचें. ५ ( सौख्य + आकर ) सुखाची खाणच निष्टा ठेवणारी. २८ विशेषण, ' रक्ताच्या ' या. केवळ असा., ६ त्यावर