पान:अकबर काव्य.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५५) कृतज्ञ मग ते नृपा समह देति पट्टी सही । मनी विषमता कशी उभयतांत राहे वदा || शार्दूलविक्रिडित. २० लंगोटी कमरेस जीर्ण फडकें लांडे जुनी मेखला । दोरी ठोसर कांबळे हि न नवें खांदां उनी पोळला । पोरें बाइल हीं दिगंबर अशी आहेत यत्संग्रहीं । नाहीं एक कपर्दिकाहि फुटकी राहे भिकारी गृहीं ॥ खावें काय उद्यां कसा तरि अहो हा आजचा लोटला । आहे वासर मानसी भडकला चिंताग्नि पोळी भला । ऐसे शेतकरी जया नृपतिच्या राज्यामधें आसती । जाळा त्यास गरीब बोलति खरी ही राक्षसी आकृती ॥ २१ जो राजा करभार दुःसह जना घे कोश लोर्भे भरी । थोडेसे अधिकारि पावुनि धना होती कुबेरापरी ॥ लक्ष्मी - पुत्र परंतु संघ बहुधा लागे जनांचा भिके । नोहे तो नृप राक्षसेंद्र गणिला विद्वज्जनीं है निकें ॥ बोले गोड वरी सुध्रेपरि खरा विश्वास नाहीं जनीं । सारीही दुबळी प्रजा करुनिया हर्षाब्धि पावे मनीं ॥ झाला अंध तृणासमान गणि जो ती दुष्ट-धी श्रीमदें । पावे खास विनाश शेवढं यशा अन्याय कोणा न दे २३ लोकांचे निज राज्य-पद्धति वरों निष्किंचनत्वामुळें । जे होती बहु हाल देखुनि वरी नक्राश्रु गाळी बळें ॥ ४ कपटाचे अश्रू. १ जामदारखाना. २ श्रीमंत 3 प्रजा. २२