पान:अकबर काव्य.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५४ ) राज्यव्यवस्था. . नृपाळ निवडी जनीं चतुर पारखी मौक्तिकें | तया समुचिती पदीं करि विरुद्ध तो कौतुकें ॥ प्रजेस सुखसंपदा अधिकृतां प्रतिष्ठा भर ॥ वरी बहुत साजलें स- विधुं सैर्क्ष राज्यांवर ॥ कुशाग्र- मतिनें नृपं प्रथम पाहुनी देश हा । सुपीक बहुधा असे विपुल धान्य तें दे महा ॥ असे प्रमुख संपदा रुचिर चिंतुनी एथली । १५ कृषीवल - गणां दिली सुनियमी स्थिती चांगली ॥ १६ गणी नृप - शिरोमणी भरत भूमि देहीं भला । - कृषीवल - गणास तो सतत ओपितो जो बला ॥ खरा परम चांगला सुदृढ पृष्ठ - वंशै स्वयें । कधी अवळ त्या ह्मणे करूं नये नृपें स्वोदयें ॥ विचार करुनी मनीं सुपरिपक्क भूपाग्रणी । ह्मणे कुशल तो खरा वदति योग्य माळी जनीं । करी विपिची सदा उपवनांत जोपासना | मिळोनि फळ पुष्प त्या स फळ होय तत्कामना ॥ . तसा नृप हृषीवला सुपटु राखि नानापरी । स्वराष्ट्र - गत संकटीं मदत देउनी सावरी । १ स्थापित २ चंद्रासहित असें 3 ( स + ऋक्ष ) नक्षत्रांसहित. ( राज्य + अंचर ) राज्य हेंच आकाश. ५ पाठीचा कणा. ६ वृक्षाची. १७ १८