पान:अकबर काव्य.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५२) रत्नांची खाने मी करंडक तसा तूं सद्गुणांचा खरा । जीवा निर्झर - भुमि मी हि करुणा- सिंधूच तूं आसरा ॥ ६ मी जैसा लघु-शैल वेष्टित असे चित्तास आकर्षक । मंत्र्यांनी निज युक्त तेवि अससी वा तूं प्रजानायक । राज्य श्री - पति तूं सु-लक्षण वन - श्रीचा पती मी असें । मेघां धरिं मी शिरें बुधसभा त्वद्वेहिं मान्या वसे ॥ तूं बा पाळिशि संग्रहीं नरपते शूरांस सिंहांस मी । तेणें तूंहि तसाचि मी परजनानुल्लंघ्य आहों कमी ॥ आहे गा स्थिरतेमधे उभयतांमाजी नरेंद्रा दें । कोण ? प्राज्ञ समान लेखिति सदां दोघांस हैं शर्म दे ॥ माथा धातुमय प्रिया चमकतो माझा रवीच्या प्रभे । उष्णी अथवा सरत्न मुकुटे सौवर्ण वा तूं सभे ॥ जेव्हां वैससि तो तुझा चमकतो तैसाच मन्निम्नगा । शेला रम्य तुझ्यापरी धवल मी आंगें धरीतों अगा । राष्ट्र दुष्ट परांस तापद तुझ्या तैसेच भीत्यास्पद । संख्यातीत सदैव राहति जसे माझ्या वनीं दुःखद ॥ लोक थोर विखार हिंसक बहू शाँर्दूल ही लांडगे । ९ घ्याया जीव तयार घोर करुनी जे नित्य सारे दगे ॥ १० १ ( पर + जन + अनुल्लंघ्य) दुसऱ्या लोकांना अतिक्रम करितां येत नाही किंवा ओलांडतां येत नाहीं असा. २ सुख. 3 माझी नदी हाच शेला. ४ भयाचे ठिकाण. ५ ( संख्या + अतीत ) असंख्य. ६ सर्प. ७ वाघ.