पान:अकबर काव्य.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५१ ) शेजारी वरल्या कडेस हिरव्या घांसें समाच्छादित । एकीच्या वर एक उंच दिसल्या त्या टेकड्या शाश्वत ॥ त्यांच्याही वरती मधे विलसला शैलेंद्र अत्युन्नत ॥ नानावर्ण सपुष्प तो तरु-गणीं अत्यद्भुतीं वेष्टित ॥ भुपाखंडल आपणा निकट ये सन्मान्य हर्षे हंसे । पुष्पांच्या बहु शुभ्र शोभन वनाच्छन्नाद्रि वाटे मिलें ॥ तैसा डोलवितो शिरास निज तो वातेरितानो कहीं । भासे थोर जनांस थोर असती कीं सादर प्रत्यहीं ॥ अभ्राची पगडी शिरों नव घरी साश्चर्य लोकां करी । वाटे पांघरला वरीहि हिरवी तो शालजोडी वरी ॥ पक्ष्यांच्या अमृताहुनी मधुरशा शब्द वदे स्वागत । तेणें तोप अ-वर्ण्य केवि न पत्रे राजेंद्र अभ्या गर्त ॥ ओपी गोड फर्के फुलै सरस त्या सत्सेव्य तो पर्वत । तैलें शीतळ निर्झरोक महत्सेवा गमे यद्व्रत ॥ वाटे पक्षि-र तयास मग तो बोले रसाळा गिरा । आहे देख तुझा अह्ना समपणा अत्यंत हा साजिरा ॥ माझी उन्नत आसतीं ध्वज नृपा शृंगे जशी सुंदर । कीर्तीचे तव लागले चहुंकडे आहेत हे शंभर ॥ २ ३ १ गवतानें. २ झाकलेल्या. 3 नेहमी असणान्या ४ ( भूप + आखंडल ) राजेंद्र. ५ ( वन + अछन्न + अदि ) बनानें झांकलेला पर्वत. ६ मिषानें. ७ ( बात + ईरित + अनोकह ) वान्याने हालविलेल्या झाडांनी. ८ अ- तिथि. ९ वाणी. १० शिखरें ११ याचा कर्ता 'ध्वज.' 1