पान:अकबर काव्य.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०) एका मागुनि एक त्यांत लहरी येतां तिथे दीसती । बिंदू ते रविकांतनें धवलशी मुक्ताफले भासतीं । ओळीने जडले हिरेच गमले ते पातळाच्या वरी । शेल्याच्या वरतीहि सुंदर वनश्रीचे जनां अंतरीं ॥ ओसंडोनि जलाशयांतिल पडे शैलप्रदेशी जल । होतें जें स्फटिकासमान बघतां दृष्टी रमे निर्मळ ॥ जोराने पडतां कड्यावरुनि तें खालीं गंभीर स्वन । घोंघों चालतसे अ- खंड वुडवी आश्चर्य - पूरी मन ॥ भासे दिव्य जल-प्रवाह पडतां चापोपरी वाकडा । कांचेचा तखताच की बसविला विश्वेश्वरे फाकडा । सूर्याची पडुनी असंख्य किरणें तेजाळ त्याच्यावरी । पत्रा सोज्वळ रौप्य बैंक गमला लोकांस अभ्यंतरीं ॥ विश्वाच्या जणुं वाटली विरचिली कारागिरे चांगली । मोठी भिंत कमानदार अथवा नामी हिन्याची भली ॥ पाणी भिन्न विभिन्न होउनि जवें त्याचा फवारा उडे ॥ इंद्राचे रविकांत बर धेनू त्यामाजिं दृष्टी पडे ॥ जोराने उसळे जळ प्रतिपळीं तो फेन- राशी दिसे । दुग्धाचा भरपूर पूर बरवा प्रत्यक्ष वाटे असे । किंवा हा अति शुभ्र बारिक अहा कार्पास हो पिंजला ॥ भासे की कण संघ थोर सर्जेला हा कापराचा भला ॥ . ९७ ९८ ९९ १०० १ १ सरोवरांतील. २ धनुष्यासारखा. 3 जगाच्या नायकानें. ४ वाकडा, कमा- नदार. ५ इंद्रधनुष्य ६ फँसाचा ढीग. ७ घाटला, बनला.