पान:अकबर काव्य.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९) ९२ ९३ जेथे जाइल भूमिपृष्ठि म्हणती कीं भाग्यशाली नर । तेथे श्रीहरिच्या कृपें करुनियां तत्सेवनीं सादर ॥ होती गोष्टि निजानुकूल सगळ्या रानीं म्हणा कीं घरीं । राजा येइ सरस्त विधिवशे तो सूर्यसा अंबरीं ॥ पद्मांनी भरलें सुगंध पसरी तें तूर्ण चोहींकडे । साह्या पावुनि वायुदत्त सुख तो देई जनां रोकडें ॥ लोकातें सुचवी परांस सुख द्या तेणें वरा धन्यता । जाणा सार जगीं परोपकृति हैं ते दे खरी मान्यता ॥ राजा पूज्य समीप येइ ह्मणुनी जाणों सरे धाडिला । त्याचे स्वागत व्हावयास निज- संसर्गे बहू चांगला । वायू शीतल मंद कार्य निज तो उत्कृष्ट रीत्या करी ॥ कीं धर्म-स्तुत चांगली अतिथिची आहे जगीं चाकरी ॥ ९४ वाटे आसन घातले नृपवरा विस्तीर्ण काठी शिला । होत्या निर्मळ भव्य ज्यांवरि तरु- च्छाया असे शीतला ॥ तेथे कोकिळ भृंग गायक जण गाती रखें सु-स्वर । आनंदान्धित पोहला स-गंण तो सत्सेव्य राजेश्वर ॥ ९५ मध्यान्हीं रविच्या प्रभे सर दिसे तें रौप्य पत्रा नवा । पारा पातळ शुभ्रवर्ण अथवा येना मनीं वानवा । नेत्रांनी तायें पाहतांचि गमला कोणा महा- दर्पण । बिंबाचें रविने जिथे निज गमे केलें असें अर्पण ॥ ९६ १ परापेकार. २ आपल्या स्पर्शानें. ३ धर्मांत वाखाणलेली. ४ आपल्या मंडळी सहवर्तमान. ५ संशय.