पान:अकबर काव्य.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अकबर- काव्य. मंगलाचरण शार्दूलविक्रीडित विश्व स्थावर-जंगमात्मक असे यच्छक्तिचे द्योतक । शिल्पी अद्भुत सर्व शिल्पे दिसते ज्याचें मनोवेधक ॥ जो जो वैभव बुद्धिचे खरचुनी पाहे तयातें नर । आश्चर्याबुधि-मन-मीन असतो तद्वंदनीं सादर ॥ वाग्देवी तवद-पंकज मनीं ध्यातों तुझा दास मी । माते हस्त तुझा शिरीं जरि असे मातें न कांहीं कमी ॥ ग्रंथाधीस तरेन दिव्य करुणा-नौका तुझी लाधतां । व्हाया पंडित तुष्ट येइल मला वागर्थ ही साधतां ॥ उपजाति. १ २ काव्याख्यै- सिंधूतिल कर्णधार । नमूनि वाल्मीकि सहस्रवार ॥ त्यातें तरायाप्रति सिद्ध झालों । गळ्यांत कां सिद्धिन माळ घालो ३ १ प्रकाशक. २ कलाकौशल्य मनोरम ४ ऐश्वर्य, सामर्थ्य. ५ कौतु- काच्या समुद्रांत बुडलेला मासाच जसा कांहीं. ६ तत्पर. ७ वाणी हीच देवी, सरस्वती, ८ चरण-कमल. ९ ( ग्रंथ + अब्धि ) ग्रंथरूप समुद्राला. १० वाणी आणि अर्थ. ११ कविता नांवाच्या समुद्रांतील. १२ नाव चालविणारा नावाडी - सुकाण्या + स्थिर चररूप.