पान:अकबर काव्य.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४५) स्वहस्तगत राष्ट्र तें करुन नंदनोद्यानसें ॥ दिले नृप - पुरंदरा सतत तुष्ट जो मानसें ॥ पुढे कितिक घ्यावया दिवस भूप विश्रांतिला ॥ निघोनि विषयीं तया परम रम्य गेला भला ॥ प्रयत्न अघि चांगला सफल कार्यकारी मग ॥ करी उचित संतत त्रिदिवे हैं विसावा जग ॥ सर्वे चतुर साहसी परम आप्त लोकांस घे ॥ मुखांतुन सुधारसासम यदीय वाणी निघे । तसें हृदय हैं सरोवर सुपूर्ण मोदें जलें ॥ हुशार मृगयेंत जे चपल धीट नांवाजले || मृगया. गीति. मृगयोचित वेषाने युक्त हयरूढ नरवरेश जवै ॥ ६८ ६९ ७० परिवार उचित परिमित स शस्त्र घेउनि निघे स-तोष सवें ॥ ७१ टाकुन घोडे मागें धांवति वेगें तथा पुढे कुतरे || यद्भषित - श्रवणोत्तर वन्य पशु- स्वबल - गर्व झट उतरे ॥ धांवत असतां त्यांच्या हालति जिव्हा मुखांत आरक्त ॥ गमले उत्सुक चांद्र हत- संत्वाचं करून आ-रक्त ॥ ७२ ७३ २ ( नंदन + उद्यान ) नंदन वनासारखें. २ राजेंद्रास. ३ स्वर्ग. ( हय + आरूढ ) घोड्यावर बसलेला. ५ ज्याचं भुंकणें ऐकिल्यानंतर. ६ मारलेल्या प्राण्यांचे. ४