पान:अकबर काव्य.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४) तसाच अधिकार हा सतत मोंगलाचा वरी । स्ववृद्धि परमा नवे विषय लाभतां लौकरी ॥ अध अधिं नृपागणी शमवि शत्रु एकीकडे । दुज्या उठति ते क्षणें त्वरित थोर तैं वाकडे ॥ भयंकर महावली अतुल पक्षघातापरी । ॥ समूळ निवटी स्वकीच विषय - देहिं धन्वंतरी ॥ कधी रतनभोर घे नृपति वीर सिंहाग्रणी । कधीं स चमु जाउनी रुचिर गुर्जरातें* रणीं ॥ प्रतापरवि खालवी स्वरिपु तारका संघ हा । तरी सुखवि चंद्रिका धवल - कीर्ति लोकां पहा ॥ पराभवुनि दाउद प्रति - खीच तो काजवा । धनाढ्य निज मेळवी विषय गौडा मोठा नवा ॥ बहारहि पुढे करी स्व-वश भूप झुंजार हा । - सुर्खे निज भटां ह्मणे विजय युद्धि झुंजा रहा ॥ महा- कलह माजला नृपकुलांत काश्मीरिं ही । . जयीं श्रुति-पथांत ये चतुर नाथ वाती जिहीं ॥ अनेक समयीं रणीं विजय मित्र केला स्तुत । तयां विषय घ्यावया स बळ पाठवी प्रस्तुत ॥ मृगेंद्र शिरतां वनाप्रति करी क्षण आपलें ॥ तसें नृपतिच्या जनीं बहु पराक्रमी त्या भले ॥ ६३ ६४ ६५ ६६ ६७ १ ह्या नांवाच्या रोगाप्रमाणें. २ देशरूप देहांत 3 केवळ धन्वंतरीच असा आक्चर. * गुजराथ देशास. ४ दाउदखान नांवाचा बंगालचा प्रतिपक्षी सरदार. ५ प्रतिसूर्य बिंगाला. ६ चतुरांचा नायक. ·