पान:अकबर काव्य.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४३) इंद्रवंशा. सत्कीर्तिचा मंडप थोर अक्बर । घाली स्वर्ये उत्सुक जो मनोहर ॥ त्यातें कुदृष्टी न करो पिडा कधीं । संपादि हा खेटर जीर्ण की अधी ५७ उपजाति. जसा महासागर शांत राहे । तारी जना सौख्यद सौम्य वाहे ॥ तुफानं तो क्षुब्ध करी निमग्न | सर्वांस आशा करूनी वि- भग्न ॥ ५८ तैसा गमे एथ नृपाळ सौम्य । चंद्राहुनी शितळ नित्य रम्य ॥ संतप्त होऊनि अकार्यकारी । क्षणैक झाला कु- मनोविकारी ॥ ५९ आनंदभेरी बडवीत आला । पुरा स्व तद्दर्शनिं तो निवाला ॥ उंचबळे हर्ष - समुद्र तेव्हां । तो पावला हो नृपचंद्र जेव्हां ॥ ६० चीस्ती सिजिस्तानि फकीर ज्याचा । पवित्र दर्गा नृप आज्मिरींचा ।। गेला तिथे प्रेमळ भक्त पायौं । विश्वास हा तारक हो अपायीं ॥ ६१ राज्यवृद्धि. पृथ्वी. क्रमैं करुनि वाढले नृपति - राज्य *सौख्यागर । उपाय तfर्य योजक प्रथम तो दया-सागर ॥ अखंड करि अक्बर प्रभु शिरोमणी तीन ते । परि प्रधन शेवटी जरि नये अरी नम्रते ॥ प्रवाह नदिचा जसा उगामें आसतो सान तो । समुद्र पुढे पुढे नवनद्यांमुळे वाढतो ॥ १ मुसलमानी साधूंचा मठ, त्यांत पीर असतो. + राजांचा मुकुटमणी.

  • सौख्याचा बाग.

६२