पान:अकबर काव्य.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. - ( ४२ ) ५० यशोनगाच्या अति उंच शृंगी । आरूढ नारी नर - पद्मि भृंगी ॥ तल्लीन पंक्ती न कवीश्वरांच्या । होती कशा मार्मिक थोर साच्या ४७ तृणार्थिचा है जलबिंदु आयु । प्राण त्यजी भंगुर देह - वायु ॥ चिंतून है जो स्वतनूस टाकी । यशः शरीरें उरतोच बाकी ॥ ४८ तसाच यच्छौर्यमणी अमोल । निर्भीक सर्दार हि यंत्र - गोल ॥ लागूनिया तो जयमल्ल होय । यमालयाचा अतिथी शिवाय ॥ ४९ बाकी पुढे अट सहस्र वीर । धावून गेले रण - दक्ष धीर ॥ संशप्तक प्राप्त रणांत काय । ते होमिती शेवटचा उपाय ॥ आंगे लढे आक्बर युद्ध-रंगीं। सावेशही तद्भट ह्या प्रसंगीं ॥ वरीति त्यातें जयलक्ष्मि कीर्ति । झाली सुदैवेंच तदिष्ट - पूर्ति ॥ ५१ किल्ला करीं ये निज तैं अजिंक्य । चितोडचा बादशहा अशक्य ॥ ह्मणे घडे शक्य पराक्रमानें । सत्कारि सानंद भटांस मानें ॥ ५२ पुरीं शिरे सैन्य करी धुमाळी । दया नृपाची अटली अकाळीं ॥ तैमूरलंगासम कृत्य केलें । मुखा अपेरों निज कुट्ट काळे ॥ गळे स्त्रियांचे चिरिले चरारा। शिरे शिशुंची हि धनौघ सारा ॥ लोमें नृपानें लुटिला कलंक । कीं लाविला शुभ्र यशास पंक ॥ ५४ मनोश देवायतनें हि पाडी । आग्यास वस्तू बहुमोल धाडी ॥ विवेक सन्मित्र पळे दिगंतीं । तो अंध वाटे मद-मत्त दंती ॥ ५५ सामर्थ्य मोठे अविचार भारी । तारुण्यही चित्त - विकार - कारी ॥ न कोणिही बोधक सन्निधानीं । हा योग येतां जागं होय हानी ॥ ५६ ५३ १ प्राण हा वायु ( भंगुर देह त्यजी असा अन्वय) २ मारूं किंवा म अशा निश्वयानें लढणारे वीर. 3 त्याचे योद्धे. ४ जवळ.