पान:अकबर काव्य.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४१ ) निर्वीर्य अन्योन्य करूनि संक्षय । होती जना शांत वरी महा-भय ॥ ३९ विच्छिन्न खड्डे अति तीक्ष्ण वर्तुळ । शीर्षे पुढे ठेवियले च नारळ ॥ संतुष्ट व्हाया रणभूमि- दैवत । होते जणो शोणित- कुंकुमान्वित ॥ उपजाति. रणी व्यवस्थैतहि अव्यवस्था । जेथें तिथे हीच दिसे अवस्था ॥ वीर-क्षये वह कैरी रिकामे । वि हस्त ही योध फिरे स्व कामें ॥४१ चितोड वीरी रण धैर्य दाटे । रणोत्सव प्राज्य मनांत थाटे ॥ न भीतिलेशासहि त्यांत जागा । तच्चित्त सांगे स्वजयार्थ जागा ॥ ४२ चोंडा महाशूर - शिरोवतंस । रणाग्रभागीं रणदेवतेस ॥ करी स्वदेहापण उत्सवानें । ही सत्कृती लोक अ-कुत्स वॉने ॥ ४३ पहा लढे नायक केळव्याचा । नवा वयें षोडश हायनांचा ॥ . I युद्धात्र यायी रणरंगधीर । पंचाननाचा जणुतो किशोरं ॥ ४४ तो हो उदासीन न तात- घातें । म्हणून त्याची जननी स्वहातें ॥ धरूनि सावेश मनीं कृपाण । सोत्साह त्यातें करि सावधान ॥ ४५ हे काय त्याची ललना लढेही । होती स्त्रिया वीर रसें वि - देही " ॥ नरां तरी धैर्य भरे अपार । पराक्रमाची खनि दुर्निवार ॥ ४६ १. घोडे. २ हत्ती. ३ हात तुटलेला. ४ स्वेच्छेनें. ५ एक रजपूत वीर. ६ अनिंय. ७ वर्णितो. ८ हैं एका शूर रजपुताचें नांव आहे. ९ वर्षीचा. १० मुलगा. ११ ज्यांस देहभान नाही अशा.