पान:अकबर काव्य.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०) सैन्यांतले खिन्न अपार मानसीं । वाणी मुखे काढिति ते तदा असी ॥ त्यांनी पुढे तैं रणभूमिला बळी । कापून तच्छीर्ष दिला न आकळी ॥ ३४ त्यांचे मना शांति सतेज सोशिती । मानी न केव्हां अपमान सन्मति ॥ ३५ राजा जरी भीति धरी मनीं पळे । सर्दार गंभीर बलाढ्य जाहले ॥ सिद्ध प्रमोदें लढण्या न नींव ते । जावोत जाती असु जाउ बोलते । दोन्ही दळे क्षुब्ध जसें महार्णव । एकावरी लोटति एक ते जव ॥ मोठा धरूनी रण घोर माजले । तें अंतकाचे दरबार साजले ॥ कोठे कुठे मेदिनि' सागरीं शिरे । कोठें तसा सागर आंत संचरे ॥ भूमीवरी तेवि फळया द्विसैन्यंग | मार्गे पुढे होति रणांत त्या मग ॥ लाटेवरी लाट समुद्रि आदळे । तैशी फळी एक दुजी वरी बळें ॥ ३६ ३७ ३८ १ ( तत् + शीर्ष ) त्या उदेसिंगाच्या राखेचें मस्तक. २ कीर्ति, ३ प्राण. ४ बोलते जाहले अशी योजना. ५ जमीन. ६ शिरतो. ७ दोन सैन्यांतील.