पान:अकबर काव्य.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२) असे शब्द · पीयूष तो तुष्ट चित्तें । पिई कर्ण युग्में धरोप स्व - हस्ते ॥ - ह्मणे वाढवा शत्रु जिंका जुना जो । चितोडाधिप प्राप्त दुष्कीर्ति लाजो ॥ - असा राज चूडामणी बोल बोले । तयाने रणा वीर ते सिद्ध झाले ॥ नरां वीर खाऊ मुलां तैचि वाटे । रणोत्साह ऐसा मनीं फार दाटे ॥ चितोडावर स्वारी. इंद्रवंशा. होता चितोडाधिपती बलाग्रणी । नामें उदेसिंग मृगेंद्रसा रणीं ॥ दिल्लीपतीतें वश तो न जाहला । की पारतंत्र्या न खुषी हलाहला ॥ त्या पारतंत्र्यात्मक दुःख - वारिधी । मोठा असे दुस्तर मान्य योग्य धी ॥ स्वातंत्र्यपीयूषच सौख्य कारक । होतो कसा तो रजपूत - नायक ॥ स्वातंत्र्य ऐसें निज दिव्य मौक्तिकं । - शोभास्पद प्राज्य खरें अमोलिक ॥ ९५ ९६ ९७ ९८ १ कानांच्या जोडीनें- दोन कानांनी, २ राजा. ३ रण. ४ विषास. ५ मोतीं.