पान:अकबर काव्य.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) मोठा तुला मी अधिकार अर्पी । जो संपदा देउनि नित्य तर्पी ॥ सरोवरा सुंदर काक टाकी । पी खापरींचें जल तूं असा कीं ॥ ७९ लावण्य - खाणी रमणीय रामा। संती तरी ये कुन। न कामा ॥ कदा रुचेना कुलटेपैरी ती । त्वां सेविली आज तशीच रीती ॥ ८० हा बोल बोले नरसिंह कोपें । क्षणांत शोभे हि तदीय लोपें ॥ जाणा महात्मे क्षण-कोप सारे । न पद्म-पत्रीं जल-बिंदु थारे ।। ८१ इंद्रवज्रा. । - आग्रयास येतो अंकलंक चंद्र । प्रेमें प्रजा वत्सल भूपतींद्र ॥ सानंद त्यातें जन सर्व पाहे । जाणों तया नित्य नवीन आहे ॥ ८२ - इंद्रवंशा. एके दिनीं तो नरवीर भूषण । आकारुनीया सरदार भाषण ॥ गंभीर अर्थ परिपूर्णसें करी । पीयूष ज्याची न करूं टिके सरी ॥ ८३ सरदारांस बोध. भुजंगप्रयात. घराला घुशी लागुनी पोखरीती । अरी मोगलां पीडिती याच रीती ॥ रणों पंजरों त्यांस कोंडोनि झोडा । यशाची खरी निस्तुला ठेव जोडा ॥ ८४ ५ त्या १ स्त्री. २ पतिव्रता. 3 अधम पुरुषास. ४ जारिणीप्रमाणे कोपाच्या ६ नाशानें, अभावानें. ७ क्षणभर टिकणारा आहे कोप ज्यांचा असे. ८ स्थिर राहतें. ९ निष्कलंक. १० पिंजयांत.