पान:अकबर काव्य.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २७ ) तारित किति गभीर जहाजें । वादळांत किति दुर्धर गर्जे ॥ फेकितो लहरि उंच जवानें । श्लाध्य ज्यास कविचा गण वाने ॥ ६४ मेळ हेंच तरणें नृप मानी। फूट हेंच मरणें अभिमानी ॥ जो असा मन घरी सु-विचार । सार्वभौम जय तो वरि धीर ॥ ६५ द्रुतविलंबित. नृपतिचे वय सान बिलोकुनी । म्हणति ते मदमत्तपणें धनी ॥ करुनि होउं तदीय पराभव । रिपु तयार रणासि अशास्तव ॥ ६६ उपजाति. जवानपूरावर शीरशाहा । बंगालचा नायक दूसरा हा ॥ ये चालुनी खानजमान वारा । तृणास त्या तैं उडवी असारा ॥ ६७ तुरंग वेगी' मदमत्त दंती । यांच्या रणीं लाभति थोर पंक्ती ॥ अपार तैसा धन - राशि लाभे । तो स्वार्थ राखी सरदार लोभ ॥ ६८ ही बातमी शोधक बादशाहा । ये कर्णमार्गात सवेग तैं हा ॥ . गेला तया संनिध राजहंस । महा प्रतापी स्व. कुलावतंस ॥ ६९ विश्वास घातोसम पाप नाहीं । कशी तुझ्या अंतरि कल्पना ही ॥ येना स्वपापै बुडतात लोक । सिद्धांत हा शुद्ध असे विलोक ॥७० समीप ज्याच्या सरदार ऐसे । कुकर्म त्यातें यश सक्त कैसे ॥ धोंडेच वाटे जड हे गळ्यांत । विघ्नप्रवाहीं करिती तदंत ॥ ७१ १ निःसत्व अशास. २ वेगवान्. ३ आपल्या उपयोगासाठी. ४ ( स्व + कुल + अवतंस ) आपल्या कुळास भूषणभूत.