पान:अकबर काव्य.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६) - अंबराधिपति मल्ल - बिहारी ॥ राज सिंह रण- पंडित भारी ॥ भेटुनी स्व-वश त्यास कराया । जाय त्याजवळ कल्पक राया ५४ बैसला गजं - वरावर भूप । बाबराख्य- नृप सत्कुलदीप ॥ अंध जो बहुत होय मदाने । काय ये निज-पथांत न जाणे ॥ ५५ बादशाह - सरदार गजास । पाहुनि त्यजिति ते स्व-निवास ॥ "धैर्य - शैल परि मलै न हाले । धन्य शौर्य ह्मणुनी नृप डोले ॥ ५६ सत्परीक्षक अनर्घ्य मण्याचा । जाणतो गुण सुखास्पद साचा ॥ तो तसा तदितरांस कळेना । सुझ वा ! नृपति केवि म्हणेना ॥५७ आक्चर-प्रभु तया प्रति भेटे । स्नेह तद्दृदायें सादर दाटे ॥ - राजपुत्र यवनाधिप - सख्य । अग्नि वायु- नव-संगम योग्य ॥ ५८ मल्ल दे - निज तया तनयेला । मित्र- भाव दृढतेप्रति गेला ॥ शक्ति मोंगल - पतीत दुणाचे । ऐक्य लोकिं बल - वर्धक गावें ५९ तंतु तंतु मिळतां दृढ दोर । होय बांधि मग तो गज थोर ॥ की अणूस अणु लागुन होई । फार भक्कम शिला नर पाही ॥ ६० अल्प अल्प परि की असंख्य । सागरोदरिं गभीर अ - गम्य ॥ निर्मिती स्व- कृतिने धरणीचे । भाग रम्य अति विस्तृत साचे ॥ ६१ ज्यांवरी नद - नदी - समुदाय । उंच पर्वत वनेंहि शिवाय ॥ नांदती मनुज - संघहि राज्य । स्थापिती सुखदं थोर अवय ॥ ६२ की अपार जल - बिंदु मिळून । तो प्रचंड बनलाहि नदी । ज्यांमधे हिम-नगापरि थोर । राहती किति शिलोच्चय घोर ॥ ६३ १ जयपूरचा राजा बहारमल्ल. २ मोठ्या हत्तीवर. ३ धैर्याचा केवळ पर्वतच. ४ बिहारीमल्ल. ५ वाहवा. ६ प्रवाल-कीटक. ७ गंभीर. ८ ( नदी + इन ) नद्यांचा स्वामी - समुद्र. ९ ( शिला + उच्चय ) पर्वत.