पान:अकबर काव्य.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २४ ) दयाब्धी चिंतूनि स्मरुनि गुण - पंक्ती बहु बरी । स्वयें बैरामाची उचित वितरी सांत्वन करी ॥ अकबराची स्वतंत्र राजसत्ता. शालिनी. ३७ पारतंत्र्य निज- मस्तक भार । दूर टाकुन जनेंद्र उदार ॥ मोकळा त्वरित होय गुणांनीं । ग्रस्त-मुक्त जन त्या रवि मानी ३८ सन्मणी जरि करंडकं आहे । गुप्त तेज तरि तद्वैत राहे काढितां तिथुन फार चकाकी । तो करी प्रकट बाहिर लोकीं ॥३९ तीन मुख्य मग हृद्रत हेतु । साधण्यास करि संकट - सेतु ॥ यत्न सत्वर अ-मंद मनानें । सत्क्रिया निरत होय जवानें ॥ ४० शत्रुच्या परिभवें तिजराज्य- काननांत भर घालुनि योग्य ॥ सद्व्यवस्थिति- सुनीति - जलानें । भव्य बाग रमणीय साधणे ४१ कारभार नव-पद्धति-योगें । चालवून सगळा अनुरागें ॥ राज्य - वृक्ष दृढ-बद्ध मुळांशीं । सुज्ञ हा करूं म्हणे बल - राशी ४२ जाति धर्म कँलि-कारण भिन्न । एथ नांदति सदैव अ - खिन्न ॥ गोष्ट पाहुनि अशी सम- दृष्टी । कल्प - वल्लिच गणी निज पोटीं ॥४३ स्वामि भक्त बलवान् रजपूत । सत्य निष्ठ बहु सद्गुणवंत ॥ भव्य - देह अति - शूर मनाचे । देश रक्षक असे जन साचे ॥ ४४ - १ योग्य आश्रय देता झाला. २ ग्रहणांतून मुक्त झालेला. ३ त्यांत असणारें. ४ संकटें तरून जाण्यास पूलच केवळ ५ पराभवानें. ६ प्रीतीनें. ७ भांडणाचें मूळ असे. ·८ सारखेपणाची दृष्टि ९ रजपूत लोक. १० धिप्पाड शरीराचे.