पान:अकबर काव्य.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २३ ) स्नेही नृपाचे जननीहि धात्री । 'तो प्रेमभावा धरि ह्या सुपांत्रीं ॥ न, तो पद भ्रष्ट ह्मणून झाला । न नीति-नैपुण्य म्हणों अशाला ३२ सिंहास आलिंगन गाढ देणें । कीं अग्नि कुंडांत उडीस घेणें ॥ सर्पास पाये शिवणे तसे वा । असे महा-दुर्धर राज-सेवा ॥ शिखरिणी. मनुष्याची सृष्टी अधिक बरवी सद्गुण-गणीं । जशी तैशी आहे अधम-तमते दुर्गुणि गंणीं ॥ अहा बैरामातें रिपु-तनय मक्का - पथि वधी । कराया वैराचा निज अचुक निर्यातन-विधि ॥ पतीच्या घातानें प्रखरतर आर्कस्मिक अशा । पडे बैरामाची धरिणिवरि शोकार्त, कुदशा ॥ जिलागांठी, कांता दव-दहनं ते होरपळली । कुरंगी की वज्रे निहत पडली म्लान कर्दली ॥ तिला बैरामाच्या जिवलग जर्ने भूप निकटीं । तदा कालिंदीच्या अति सुभगे आग्रा-पुरिं तटीं ॥ त्वरेनें नेलें कों निवविल दयाँ - सिंधु तिजला | भुकेला प्रेमाचा सुरतरुच दीनाश्रय भला ॥ अनाथांचा स्वामी स-सुत मग पाहून विधवा । ३३ ३४ ३५ ३६ नर- प्ररब्धाच्या गहन गति चित्तीं अभिनवा ॥ १ बैराम. २ योग्य ठिकाणी. 3 दुर्गुणांनी. ४ मी मानितों. ५ सूड उगा- विण्याचें कर्म. ६ एकाएकीं घडलेल्या. ७ हरिणी. ८ केळीचें झाड ९ सुंदर. १० दयेचा समुद्र - अकचर. ११ कल्पवृक्ष. १२ मनुष्याचे देवाच्या.