पान:अकबर काव्य.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २१ ) क्रोधाग्नी मज जाळितो प्रखर तज्ज्वाला न सोसे जिवा । याचा सूड रणांत जिंकुनि तया घेईन घ्याया शिवा ॥ पृथ्वी. प्रचंड मग तो करी प्रखर बंड संतापला । बनासवन वन्हिने विषय तो तसा व्यापला ॥ परि प्रबळ आकबरें नव-घनें वळोनी तिथें । पराक्रम - जलें तथा शमविले सुर्खे सत्पथें ॥ शार्दूलविक्रीडित केलेले उपकार आठवि मनीं भूपाळ - चिंतामणी । दोषातें न गणून थोर हृदये सन्मान्य लोकाग्रणी ॥ मक्केला मग पाठवी व्यसु परी मार्गात केलें तया । पुत्रे तातवध स्मरून मग तो धालों ह्मणे निर्दयी वाटे प्राण जसा तसा प्रिय मना जो मानवाच्या नर । आतां प्राप्त घडीस तोच पुढच्या वि-द्वेष्य जैसे गरे ॥ ह्याचा व्युत्क्रमही कधीं जगि जना येतो असे' प्रत्यया । प्रेमाप्रेमहि चंचलत्व धरितें सिद्धांत हा सत्य यी एका सगुण आपले अणु तरी ते पर्वता एवढे । मोठे भासति हृत्पटी निज पहा आश्चर्य हें केवढें ॥ २२ २३ २४ . २५ १ कल्याण करून घेण्यास २ देश. 3 नवीन मेघानें. ४ (वि + असु ) प्राणहीन. ५ बैरामानें एका अफगाणास मारिलें होतें त्याच्या मुलानें. ६ निर्दय बैरामा ७ पुढल्या ( घडीस घटकेस ) ८ तिटकारा येण्यासारखा. ९ विष. १० उलटापालट. ११ याचा कर्ता ' सिद्धांत. '१२ याचा अन्वय 'जगी' या शब्दाकडे.