पान:अकबर काव्य.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २० ) ऐसा आणुन सद्विवेक हृदयीं भूपाल संघीग्रणी ॥ घे हातीं निजराज्य - सूत्र अवघें वाखाणिला सज्जनीं ॥ - स्रग्धरा. - १८ १९ गेला दिल्ली - पुरीतें प्रकट जनिं करायास हा भुप वर्य । हेतू आदेश पत्रे अधिकृत पुरुषां पाठवी साध्य - कार्य ॥ बैरामातहि धाडी विष- विषम असा स्वीय आदेश हा कीं । जावे मक्केस जीतें यवन गणिति सन्मार्ग जायास नाकीं ॥ धाडी, पावेल पैसा नियमित समयीं धर्म कृत्ये कराया । प्रांतीचा नेमलेल्या विपुल तुजकडे हा असा लेख राया ॥ stai बेराम पाहे निजमनिं खवळे व्याघ्र की सिंह सर्प ॥ किंवा मोठ्या तुफानी, दर्वदहन वनीं, सिंधुसा तो सदर्प ॥ २० कोपें आरक्त डोळे करुनि मग ह्मणे, बोलतां ओठ कांपे । रायाला पाय आतां सहजच फुटले, वाढला मत्प्रतापै ॥ त्याची वार्ताहि नेणे त्वरित मज वदे आज एथून जाणें । त्याचे खोदें परी ही प्रबळ परतवीना कसें त्यास नाणें ॥ २१ शार्दूलविक्रीडित. विद्या मी दिधली तया स्वकृतिनें त्याणें तियेचें फळ । थोड्याशा समयांत आजचि दिले आहे मला पुष्कळ ॥ १ राजांच्या समुदायांत श्रेष्ट. २ आज्ञापत्रे. अधिकारावर ठेवलेल्या. ४ ज्याला कार्य साधावयाचें आहे असा. ५ विषासारखा भयंकर. ६ स्वतःचा. ७ स्वर्ग लोकांत ८ दव नांवाचा अभि-वणवा. ९ हैं नाण्याचें विशे- पण. १० मी बैराम.