पान:अकबर काव्य.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६) तप्तांस, या प्रकट देउनि जन्म देवें । केले जनीं सकल - विश्रुत हैं सु-देवें ॥ होता नृपाल बल-सागर थोर शूर । १०० क्रूरत्व त्यांत नव्हतें ह्मणती उदार ॥ यत्करून जरि वाढवि राज्य लक्ष्मी । त्याच्या न लोभ वसला हृदयौख्य-सनीं ॥ होता जरी गृहिं असे तई तो विलासी । बाहेर वेळ पडतां श्रम फार सोसी ॥ ज्ञानी, धनी, चतुर फार, न गर्व वाहे । कोपे विशिष्टसमयीं परि शांत राहे ॥ १०१ २ जाणे कुशाग्र-मति तो मनुज-स्वभाव । वर्ते तसा कुशल दक्ष वर प्रभाव ॥ होता वशीकरण मंत्राहि हाच पाठ । चाले अमित्र नव मित्र बनून पाँठ ॥ जाणे न केवळ मनें नृप मानवांचीं । तो धूर्त तत्परिचयांत गजादिकांचीं ॥ झोंबी बलाढ्य करि व्याघ्र - रिसांसवेंही । आहे गमे सकळिकांप्रति वज्रदेही ॥ ४ १ प्रख्यात. २ भाग्यानें. 3 मनोमंदिरांत ४ विशेषप्रसंगीं. ५ दुर्भाच्या अग्रासारखी (सूक्ष्म) आहे बुद्धि ज्याची असा. ६ श्रेष्ट आहे तेज ज्याचें असा. ७ क्रम ( शत्रु नवा मित्र बनण्याचा.) ८ हत्ती वगैरे पशुंचीं. ९ बळकट शरीराचा.