पान:अकबर काव्य.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १४ ) बांधा सुरेख कमनीय गव्हाळ वर्ण । जात्या रसाळ वचनें प्र-वि-भक्त-वर्ण ॥ आजानुबाहुंपण सुंदरता मुखाची । भूपाळ -हीर गमला खनि तो सुखाची ॥ वाटे जनास नृ-पती जणु देहधारी । झाला पराक्रम खरोखर कार्यकारी ॥ रूपें स्वयें वि-जित- मन्मथ-रूप होता । तणोंच तोही अनुकूल जमे सभोंता ॥ तो सार्वभौमनृप निर्जरं - नाथ मानी । पीयुष सत्य रत सेवनिं तो जनांनीं ॥ होता तदय तरि सेवियला जपून । साल्हाद चंद्र रमवी हृदया अनून ॥ होता गुणज्ञ वर-धीर अ-भीक गाजी । युद्धात योधे तर त्यास सदाहि राजी ॥ दावी स्व-निर्भयपणा संमरांत लोकां । तो आपणासम करी यश घे विलोका ॥ खोदें खरें मिसळुनीहि समोर येतां । त्यांची करी निवडणूक चुकी न होतां ॥ ९१ ९२ ९३ ९४ १ रम्य. २ गव्हासारखा तांबुस गोरा. ३ स्वाभाविक पणें. ४ निरनिराळी विभा- गलेली आहेत अक्षरें ज्यांतील. ५ गुडघ्यापर्यंत लांच हात असणें ६ मूर्तिमंत. ७ जिंकिलें आहे मन्मथाचें ( मदन ) रूप ज्यानें असा. १० (अनू + ऊन) पूर्ण, ११ अ = नाही भी = भय ज्यास असा. १३ युद्धांत. ८ जन. ८ जन. ९ देवेंद्र १२ योद्धे.