पान:अकबर काव्य.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३) माता हमीदा स-विशेष हर्षे । सानंद नेत्रांतुन आश्रु वर्षे ॥ लोटांगणाने परमेश वंदी । त्याची स-भाग्या तई होय बंदी ॥ ८५ न स्वार्थ ज्यामाजि असें नसेच । खरें दुजें प्रेम जगांत साच ॥ जें माय आत्मीय सुती करोतें । ब्रह्मांड तेणें विसरून जाते ॥ ८६ वंदी पदां तो निजजन्मदेचे । ज्यांच्या नतीनें सुत-पाप वेर्चे ॥ जोडी तदाशीर्वच दिव्य दुर्ग । जें त्यास राखील हरून दुर्ग ॥ ८७ जे चांगले नंदन मातृ-भक्त । लोकोत्तरत्वे असतात शक्त ॥ करावया दुष्कर थोर कर्मै । होती मही-भूषण पुत्र- धर्मे || । अकबराचें स्वरूप व स्वभावादि गुण. 93 वसंततिलका. छाती असे बहु मनोविशाल पुष्ट । वाटे जसें सुबक थोर कपाट घट्ट ॥ दोर्दड ते विलसती जणु जाड सर्प । की अर्गलीच सुदृढा जित-शत्रु दर्प ॥ तैसेच उंच रमणीय कपाळ शोभे । आ-कर्ण नेत्र-युग पाहुन चित्त लोभे ॥ मुद्रेस शोभाव अशी सरला सुनासा । जेथें विलक्षण सदा करि तेज वासा ॥ ८८ ८९ ९० १ अतिशय, २ स्तुतिपाठक. ३ स्वहित. आपल्या आईचे. ५ नमस्कारानें. ६ नष्ट होते. ७ तिच्या आशीर्वादाचें वचन हाच उत्तम किल्ला. ८ संकट.. ९ पुत्र. १० लोकांहून विलक्षणपणानें. ११ सुंदर. १२ बाहुदंड. १३ अडसर.... १४ जिंकला आहे शत्रूचा गर्व ज्यांनी असे.