पान:अकबर काव्य.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १२ ) I श्रीमंत तेथील दुकानदार । ते जोहरी मांडुनिया अपार ॥ रत्ने हिरे आणिक पाच मोतीं । रत्नाकरत्वा उघडें करीती ॥ ७६ स्वांती जनांच्या नगरीच राका | नृपाधिपा जी धरिते मृगांका ॥ स- तेज नारी नर हेच तारे । ज्योत्स्ना स्व-संतोष अ-सीम सारै ७७ गळयांत मुक्ता-फल-लंब-हार । किरीट माथां रमणीय फार ॥ आंगीं झगा सुंदर भर्जरीचा । तेजाळ शोभा-भर भूपतीचा ॥ ७८ नृपावरी चामर दिव्य होतें । जे भृत्य संचारके आत्म-हातें ॥ ढाळीत होता, सुचवी जनां तें । कीं तो निवारीलचि संकटातें ७९ छत्र स्वर्ये भव्यहि भाव दावी । ज्याची अवर्ण्य किति भीं वदावी ॥ की बादशाहा जनतेस ताप । न होउं देणार कधीं अपाप ॥ सुरेख सौवर्ण सु-वेत्र दंड । तो जाणवी लोक-मना अखंडे ॥ हा भूप - चूडामणि योग्य शिक्षा । देईल दंड्यों करुनी परीक्षा ॥ ८१ योग्यास हा देइल योग्य जोंगा | राज्यांत कामे करण्यास जागा ॥ जो कीर्ति - संपादन- कर्मि राहे । सिंहासने ज्ञापित अर्थ आहे ॥ ८२ या चक्रवर्ती प्रति नित्य वंद्य । होतील सारे शिरसा वि-द्य ॥ ज्ञानी खरे धार्मिकही महात्मे । स्पष्टार्थ हा होय शिरोलला में ।। ८३ कंठ्या हिन्यांच्या, नव-मौक्तिकांचे । हार प्रभा-भूषित दिव्य साचे ॥ पोषाक मोठे बहु जे पसंत । अहेर होतीहि सभागृहांत ॥ ८४ 3 ८० १ स्वांता - अंतःकरणास. २ राका = पौर्णिमा. ३ ( नृप + अधिप ) नृपश्रेष्ठास. ४. चांदणें. ५ अमर्याद. ६ मोत्यांचे लांब हार. मस्तकावर. ८ शोभेचा अतिशय ९ संचारक = फिरविणारा. १० शोभा. ११ एकसारिखें. १२ शिक्षेला पात्र अशा लोक स. १३ अधिकार, १४ फार चांगले. १५ ( शिरस् + ललाम ) मस्तकावरील भूषणानें = मुकुटानें.