पान:अकबर काव्य.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ११ ) पंक्ती महा-मांडलिकांनृपांची । तशीच सर्दार वरिष्ठ यांची ॥ स-भूषणा सोज्वळही सु-वस्त्रा । सवेग ओढी जन-नेत्रमात्रा ॥ ६७ धरी पहायास सुरेंद्र आला । जणो धरेचा पति मानसाला ॥ स- देव सर्दार-नृपांत वाटे । सभा अशी ते परिपूर्ण थाटे ॥ ६८ जिथे तिथे मंगलतूर्य वाजे । मोठा समारंभ पुरांत साजे ॥ गंभीर गाजे स्वन नदीचा । आनंद दावी जनता -मनींचा ॥ ६९ शृंगारलेले गज-संघ काळे । प्रभा झुलींची पिवळी उजाळे ॥ सौदामिनी- कांति - विशिष्ट मेघ । सहर्ष तैसे बघती जनौघ ॥ ७० किंकट त्यांचे श्रवणांत येती। गंभीर वाटे धन-गर्जना ती ॥ शुंडाग्रिंचे हार तदा फुलांचे । गळ्यांत ते घालिति माहुतांचे ॥ ७१ घोडे जवाने पवनास मागें । जे टाकिती धांवति संभ्रमानें ॥ सालंकृती चित्र-विचित्र-रंगी । साश्चर्य तत्प्रेक्षक अंतरंगी ॥ ७२ वि-कोशं सादी तलवारि हातीं । घेऊन रांगेत उभे रहाती ॥ त्यांच्यावरी रवि-कांति नाचे । शोभा वि-चित्रा वदवे न वाचे ७६ दिल्ली - पतीचे वर मांडलीक । जे पातले तेथ तदा अनेक ॥ सभोवती तन्न-वस्त्र-वेश्मीं । वाटीच वाटे पुर दिव्य पद्मीं ॥ ७४ उभारलेले ध्वज उंच लोकां । शिरें निर्जे डोलवुनी विलोका ॥ जाणों स्वयं जाणविती महीप । वरील कों उन्नतता उमोपै ॥ ७५ १ लोकांच्या सर्व नेत्रांस. २ पृथ्वी. ३ ( सूर + इंद्र ) देवतांचा राजा. ४ मंगल वाद्य. ५ नाद. ६ घाईनें, वेगानें. ७ ( स + अलंकृती) अलंकारास- हवतमान. ८ मनांत. ९ म्यानांतून काढलेल्या. १० घोडेस्वार. ११ त्यांच्या नवीन डेरे राहुट्यांच्या मध्यभागी. १२ सुंदर कमलांत. १३ पुष्कळ.