पान:अकबर काव्य.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ९ ) आर्या. पाणिपताख्य ग्रामी दुर्धर - रंण-रंगधीर ये हेमू । दिल्ली- पद जिंकावें ह्यणुनि सर्वे घेउनी प्रचंड चमू ॥ ती माजी बहु होते वारण परवारणांत दक्ष रणीं । ज्यांनी केली होती पंकिल गंडच्युते मंदे धरणी ॥ मोठ्या तोफा भासति भ्यासुर तीं मृत्युचीं जणों तोंडें । पाहुनि त्यास अरीचा भयें मनांतील धैर्य नग मोडे ॥ ५१ ५२ ५३ वार्ता ऐकुनियां ही भीम पराक्रम नरेंद्रसुत वेगें । बैरामासह सेना घेउनि ये निज तदा अनुद्वेगें ॥ जाळी शुष्क वनाला वणवा संक्षुब्ध-वात-युत वाटे । त्या की ग्रीष्म तापें हेमूचें सैन्य हेच सेंर आटे ॥ ! ५४ ५५ ★ तोडी बाबर-वंशज सखड्ग गज शैल स पविचासंवसा । अल्प वयांतहि ज्याच्या ह्मणती सद्गुण निवास योग्य वसा ५६ 93 केव्हां केव्हां गज-रदिं उठती ठिणग्या कृपाण -पातांनी । त्या गमति अकबराच्या प्रताप वैश्वानरोत्थ कवि वानी ॥ ५७ १ रणभूमीवर धीट असा. २ हा महमदशहा सूर आदिली ह्याचा मुख्य प्रधान होता, हा जातीचा हिंदू होता. 3 हत्ती. ४ शत्रूचें निवारण करण्यांत. ५ चिखलाची ६ मदोदकानें. ७ जमीन. • ( अन् + उद्वेग ) उत्साहानें. ९ सोसाट्याच्या वान्यासहित. १० सरोवर. ११ वज्जासह अशा इंद्रासारखा. १२ ' (हा ) निवास ' येथें हा याचा अध्याहार आहे. १३ हत्तीच्या दातावर. १४ वलवारीच्या आघातांनी. १५ ( प्रताप + वैश्वानर + उत्थ ) पराक्रमरूप अभी- पासून उत्पन्न झालेल्या अशा.