पान:अकबर काव्य.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) शिकंदराचे वर सैन्य, त्यांनीं । सोत्साहतें जिंकुनिया तिघांनीं ॥ तया भये लावियलें पळाया । पावे पुन्हा दिल्लि पदास राया ॥ ४६ मालिनी. पुरवि नृप-वराची वासना देव-राय । तनय-विधु विलोकी दे तया खेव राय ॥ अनुभवि सुख-पारावार तो बाबराचा । तनय अतिथिं झाला मृत्युच्या मंदिराचा ॥ अवनि पति दरिद्री आणि संपन्न धीर । गुण-मणिमय विद्या देवतेचें अगौर ॥ चतुर सुखिवर स्त्री कीं पुमान् हा न भेद । धरि निज-गृह नेतो मृत्यु जीवा अखेद || निज- जनक- मृतीने शोक संतप्त - गात्र । हृदयं परम झाला व्याकुल प्रेम-पात्र ॥ अकरुण-विधि-योगें आमचे छत्र गेलें । दिन अ-सुखद कैसे पुत्र बोले उदेलें ॥ हृदय बहुत झाले शोक- पूरी उदास । तनयहि निज कैसे मित्र आणीक दास ॥ त्वरित सहज गेला तोडुनि प्रेम-पाशा । त्यजुनि जननि तेही भान नेते निराशा | ४७ ४८ ४९ ५० १ पुत्र हाच चंद्र. २ आलिंगन. ३ सुखाचा समुद्र. ४ मृत्युच्या मंदिराचा अतिथि झाला ह्मणजे मेला. ५ मंदिर. ६ पुरुष. ७ आपल्या बापाच्या मरणानें. निर्दय - अशा दैवयोगानें. ९ खिन्न. १० शुद्धि-सावधपणा.