पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १०. गुरु. सूर्यमालेतील ग्रह पहावयास प्रथम सूर्यावरून निघून अनुक्रमें एक एक ग्रह पहात पहात सर्व ग्रहांत अतिशय मोठा ग्रह जो गुरु, त्यावर आपण आतां येऊन पोंचलों आहों. मागील भागांत सांगितलेल्या लघुग्रहांशी तुलना करून पाहिले असतां, गुरु या महाग्रहाची खारी खरोखर अत्यंत विशाल व भव्य वाटणार आहे. आपल्या देशांतील तालुक्यांएवढाले लघुग्रह कोणीकडे आणि ज्या विस्तीर्ण पृथ्वीवर आपण राहतों त्या आपल्या पृथ्वीच्या १२८० पट मोठा असा गुरुग्रह तो कोणीकडे ? सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह जमवून जरी एक गोल बनविला तरी देखील तो गुरू- एवढा मोठा होणार नाहीं. एवढा मोठा ग्रह जो गुरु, त्याविषयीं आपणांस काय माहीत आहे याचा विचार या भागांत करूं.