पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. पृथ्वी व गुरु यांच्या परस्पर आकारमानांची साधारण कल्पना वाचकांस २४ व्या आकृतीवरून करितां येईल. काळोख्या रात्रीं गुरूकडे पाहिले असतां तो एका तेजस्वी बिंदूप्रमाणें दिसतो. पण अशा वेळीं या तेजस्वी बिंदूचा वास्त- विक आकार आपल्या पृथ्वीच्या १२८० पट आहे व याचें वजन आपल्या पृथ्वीच्या ३०९ पट आहे, असें कोणाच्या तरी लक्षांत येतें काय ? गुरु पृथ्वीपेक्षां आकारानें इतका मोठा आहे कीं, पृथ्वीची प्रदक्षिणा पुरी होण्यास जलमार्गानें जर तीन महिने लागतील, तर त्या मानानें गुरूची प्रदक्षिणा पुरी होण्यास पूर्ण तीन वर्षे लागतील ! नुसत्या डोळ्यांनीं गुरूचा तारा आपल्या चंद्राहून फारच लहान दिसतो. परंतु चांगल्या दु- विणींतून याचा आकार चंद्राएवढा पाहण्यांत येतो; व या- च्याभोंवतीं पांच उपग्रह किंवा चंद्र किरतात हेंहि दिसून येतें. गुरूचा प्रकाश शुक्राच्या प्रकृ शीच्या खालोखाल आहे व काळोख्या रात्रीं शुक्राप्रम गुरूचें चांदणेंहि कधीं कधीं पड़तें. इतर ग्रहांप्रमाणेच गुरु सूर्याभोंवतीं दीर्घवर्तुल मार्गानें फिरतो. सूर्यापासून याचें मध्यम अंतर ४८ कोटि २० लक्ष मैल आहे. ज्या वेळी हा ग्रह सूर्यापासून फार अंतरावर असतो, त्या वेळीं याचें सूर्यापासून अंतर ५० कोटि ६० लक्ष मैल