पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. वर ८० शेर वजन होईल, त्याचें वजन फ्लोरावर फक्त एक शेर भरेल ! या लघुग्रहावर पदार्थांचें वजन इतकें कमी होत असल्यामुळे त्या ठिकाणी आपण गेल्यास फार चमत्कारिक परिणाम दिसून येतील; आणि प्राण्यांचा जीवितक्रम विलक्षण होऊन जाईल! जर आपण या चिमकुल्या लघुग्रहावर गेलों, तर आपलें वजन पुष्कळ कमी झाले आहे आणि पळण्यास किंवा उड्या मारण्यास आपणांस कांहींच श्रम वाटत नाहींत असें आढळून येईल. त्यामुळे आपल्या पृथ्वीपेक्षां या लघुगोलावर ८० पट अधिक लांब आपणांस सहज उड्या मारितां येतील. आपल्या येथें आट्यापाट्यांच्या खेळाची लांबी ( चांभारपाटी व लोणपाटी यांमधील अंतर ) सुमारें १३२ फूट असते, आणि रुंदी (सीमांच्या रेघांमधील अंतर ) सुमारें २३ फूट असते. परंतु फ्लोरा या लघुग्रहावर आट्यापाट्या खे- ळण्याचें मनांत आणिलें, तर तेथें या खेळाची लांबी १०९६० फूट - दोन मैलपर्यंत — ठेविली पाहिजे व रुंदी १८४० फूट पाहिजे! तसेंच, लॉन्टेनिस् ह्मणून जो एक इंग्रजी चेंडुफळी- चा खेळ अलीकडे आपल्या लोकांत प्रचारांत येत चालला आहे, त्याची कोर्टें या लघुग्रहावर मैल दीड मैलपर्यंत मोठीं करावी लागतील! याप्रमाणें दोन गोलांवर पदार्थांच्या फक्त वजनांमध्ये इतका फरक होत असल्यामुळे, दोन्ही गोलांवरी- ल प्राण्यांची शरीररचना फारच निरनिराळ्या तऱ्हेची असली